येवलेवाडी मधील काचेच्या कारखान्यातील माल उतरवताना अपघात; ४ कामगारांचा मृत्यू, एकाची प्रकृती चिंताजनक
येवलेवाडी भागात दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास एका काचेच्या कारखान्यात माल उतरवला जात असताना काचा फुटल्याने हा अपघात झाला.
येवलेवाडी येथे दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास एका काचेच्या कारखान्यात कामगार माल उतरत असताना काचा फुटल्याने सहा कामगार त्याखाली अडकले.याची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. कामगारांना गंभीर जखमी अवस्थेत बाहेर काढून ससून रुग्णालयात दाखल केले. परंतु त्या ५ कामगारांपैकी ४ जणांचा दुर्दैवी मृत्यूची झाल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. तर दोन कामगारावर उपचार सुरु असल्याचे सांगण्यात आले आहे.
पवन रामचंद्र कुमार (वय ४०), धमेंद्र सत्यपाल कुमार (वय ४०), विकास प्रसाद गौतम (वय २३) व अमित शिवशंकर कुमार (वय २७ सर्व रा. येवलेवाडी मूळ- उत्तरप्रदेश) अशी मृत्यूमुखी पडलेल्या कामगारांची नावे आहेत. या घटनेत मोनेसर कोळी (वय ३१) आणि जगतपाल संतराम कुमार (वय ४१) हे गंभीररित्या जखमी झाले आहेत. याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेउन जखमींना रूग्णालयात दाखल केले. या चारही कामगारांचे मृतदेह सध्या ससून रुग्णालयात आहेत. दरम्यान, संबंधित इंडिया ग्लास सोलुशन ही कंपनी हुसेन तय्यबअली मिठावाला यांच्या मालकीची असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.