तरूणावर गोळीबार , इंदापूर महाविद्यालयासमोर घटना
इंदापूर शहर पुन्हा एकदा गोळीबाराच्या घटनेने हादरलं आहे. इंदापूर शहरात अज्ञाताने एका तरुणावर गोळीबार केल्याची घटना घडली आहे. दुचाकीवरून आलेल्या एकाने केलेल्या गोळीबारात एक जण जखमी झाला आहे. या जखमी झालेल्या तरुणाला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्याच्यावर तातडीने उपचार सुरु करण्यात आले आहेत.
दुचाकीवरून आलेल्या एकाने गोळीबार केल्यानंतर परिसरात खळबळ उडाली. अज्ञात व्यक्तीने केलेल्या गोळीबारात तरुण जखमी झालाय. गोळीबारानंतर घटनास्थळी काही लोक जमा झाले. त्यानंतर पोलीस देखील घटनास्थळी पोहोचले. या अज्ञाताने तरुणावर गोळीबार का केला, याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. इंदापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडलीये.
बारामतीमधील तरुणाच्या हत्येची घटना ताजी असतानाच इंदापुरात अज्ञाताने एकावर गोळीबार केलाय. या गोळीबारात एक व्यक्ती गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. राहुल चव्हाण असं जखमी झालेल्या व्यक्तीचं नांव आहे. तो इंदापूर तालुक्यातील शिरसोडी गावचा असल्याची माहिती मिळतेय. त्याला तीन राउंड लागले असल्याची ही माहिती मिळत आहे.
घटना घडताच इंदापूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. या गोळीबारातील जखमीला तातडीने खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. एक अज्ञात व्यक्ती दुचाकीवरून आली. त्यानं तीन ते चार राऊंड फायर केले त्यापैकी तीन राऊंड समोरील व्यक्तीला लागले आणि यात समोरील व्यक्ती गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती सध्या मिळत असून इंदापूर पोलीस घटनास्थळी दाखल झालेत. ज्याच्यावर गोळीबार झाला, त्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.