आजचा सुविचार “कधीही अपयशाचं भय बाळगू नका. अपयश हेच यशाचं...
Read Moreश्रावण महिना म्हटलं की सुरू होतात सण-उत्सव. श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील पंचमी तिथीला नागपंचमीचा सण साजरा केला जातो. या सणात पुण्यातील महिला झोके बांधून, गाणी म्हणून आणि एकत्र येऊन खेळून हा सण साजरा करतात. या दिवशी पुण्याची संस्कृती जिवंत होते. पूर्वीच्या काळी नागपंचमीला घराघरात नागदेवतेची मूर्ती स्थापन करून पूजा करण्याची प्रथा होती. आजही काही ठिकाणी ही प्रथा पाहायला मिळते. मात्र, आधुनिक काळात नागपंचमी साजरी करण्याच्या पद्धतीत बदल झाले आहेत.
यावर्षी नागपंचमी 9 ऑगस्ट 2024 रोजी म्हणजेच आज आहे. श्रावण सुरू झाला की पाचव्या दिवशी नागपंचमी साजरी केली जाते. नागपंचमीच्या दिवशी नागाच्या मूर्तीची किंवा फोटोची पूजा केली जाते. विशेषतः, पुण्याच्या जुना शहर भागातल्या मंदिरांमध्ये नागपंचमीची उत्सव साजरा करण्याची पद्धत जुनी आहे. ग्रामीण भागात शेतकरी नागांची पूजा करून पिकांचे रक्षण करतात. शहरात नागपंचमीच्या दिवशी मंदिरात विशेष पूजा-अर्चा केली जाते.
यंदा नाग पूजेसाठी शुभ मुहूर्त 9 ऑगस्टला (आज) सकाळी 12.36 वाजता सुरु होईल आणि 10 ऑगस्ट रोजी पहाटे 3.14 वाजता संपेल.
नागपंचमी केवळ एक सण नाही, तर एक संस्कृती! हिंदू धर्मात नागदेवतेला खूप महत्त्व आहे. नागपंचमीच्या दिवशी शेतकरी नागदेवतेची पूजा करून पिकांचे रक्षण करतात आणि सुख-समृद्धीसाठी प्रार्थना करतात. नाग शिवशंकराचे गळ्यातील आभूषण असून भगवान विष्णू शेषनागवर शयन करतात. नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेसह शंकराची पूजा करून रुद्राभिषेक केल्याने कालसर्प दोष नाहीसा होतो, अशी मान्यता आहे. नागांची पूजा करून पुण्य प्राप्त होते आणि सर्पदंशापासून रक्षण होते. घराच्या मुख्य दारावर नागचित्र लावल्याने नागदेवतेची कृपा होते आणि घराला सुख-शांती प्राप्त होते. नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेची पूजा करून आपण सकारात्मक ऊर्जा प्राप्त करतो आणि आपल्या जीवनात सुख-शांती आणतो.
पौराणिक कथेनुसार, अभिमन्यूचा मुलगा राजा परीक्षित याचा मृत्यू साप चावल्यामुळे झाला. आपल्या वडिलांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी, त्याचा मुलगा जनमेजयाने नागांना मारण्यासाठी नागदह यज्ञ केला. ज्यामध्ये जगातील सर्व साप जळू लागले. सर्पांनी त्यांच्या रक्षणासाठी आस्तिक मुनींचा आश्रय घेतला. ऋषींनी राजा जनमेजयाला समजावलं आणि हा यज्ञ थांबवला. ज्या दिवशी ही घटना घडली त्या दिवशी श्रावण शुक्ल पक्षाची पंचमी होती. त्या दिवशी आस्तिक मुनींमुळे सापांचं रक्षण झालं. त्यानंतर नागपंचमीचा उत्सव सुरू झाला.
विश्रांतवाडी येथील प्रतिकनगरमधील सापांची मूर्ती चौक हे पुणे शहरातील एक लोकप्रिय ठिकाण आहे. येथे नागपंचमी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.
1. ओम भुजंगेशाय विम्हहे,
सर्पराजाय धीमहि,
तन्नो नागः प्रचोद्यात् ।।
2. अनंतं वासुकीं शेषं पद्मनाभन च कंबलम् ।
शंखा पालन धृतराष्ट्र तक्षकं कालियाम तथ ।
एतानि नव नमानि नागणां च महात्मानम् ।
तस्य विषभयाम् नास्ति सर्वत्र विजयी ।
मंगेश रमेश बोचरे
"मराठी साहित्यात एम.ए. पदवी संपादन केल्यानंतर, डिजिटल मार्केटिंग क्षेत्रात स्वतःला सिद्ध केले आहे. मराठी साहित्यावरील प्रभुत्व आणि डिजिटल मार्केटिंगवरील व्यापक ज्ञान यांचे सुंदर संमिश्रण त्यांच्या कामात दिसून येते."
आजचा सुविचार “कधीही अपयशाचं भय बाळगू नका. अपयश हेच यशाचं...
Read Moreआजचा सुविचार “आयुष्याचा प्रत्येक दिवस एक अनमोल भेटवस्तू आहे. त्याला...
Read Moreआजचा सुविचार “यश मिळवण्यासाठी फक्त मेहनत नाही, तर ती मेहनत...
Read Moreआजचा सुविचार “प्रत्येक अपयश एक शिकवण असते. आपण ज्या क्षणी...
Read Moreआजचा सुविचार “शांत मनातच यशाची बीजं अंकुरतात. जेव्हा तुम्ही शांत,...
Read Moreआजचा सुविचार “कधीही अपयशाचं भय बाळगू नका. अपयश हेच यशाचं...
Read Moreआजचा सुविचार “आयुष्याचा प्रत्येक दिवस एक अनमोल भेटवस्तू आहे. त्याला...
Read Moreआजचा सुविचार “यश मिळवण्यासाठी फक्त मेहनत नाही, तर ती मेहनत...
Read Moreआजचा सुविचार “प्रत्येक अपयश एक शिकवण असते. आपण ज्या क्षणी...
Read Moreआजचा सुविचार “शांत मनातच यशाची बीजं अंकुरतात. जेव्हा तुम्ही शांत,...
Read Moreआजचा सुविचार “प्रयत्नांमध्ये सातत्य असणं हे यशाचं खरं गमक आहे....
Read Moreआजचा सुविचार “तुमच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करा, आणि इतर गोष्टींकडे...
Read Morewww.punepublic.com
Know More About Pune...
पुणे शहरातील घडामोडी, स्थानिक कार्यक्रम आणि समाजातील बदल यांची माहिती आपणास मनोरंजक आणि उपयुक्त माहिती पुरवण्याचे आमचे ध्येय आहे.
WhatsApp Us
🟢 Online | Privacy policy